मुंबई : कोर्ट फी वाढीविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
Continues below advertisement
कोर्ट फी वाढीविरोधतल्या याचिकेचा विरोध करत राज्य सरकारनं फी वाढीचं समर्थन केलं आहे. आतापर्यंत जास्तीत जास्त 3 लाख रुपये फी घेण्याची मुभा होती, ती आता 10 लाख रुपये करण्यात आली आहे. त्याविरोधात औरंगाबाद बार असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. मात्र सरकारनं याबाबत आपली बाजू मांडत फी वाढ योग्य असून त्याचं समर्थन केलं आहे. कोर्टातील कामकाज, त्यातले पेपर अशा अनेक गोष्टींसाठी कोर्ट फीर आकारली जाते.. मात्र त्याची फी दुप्पट करण्यात आल्यामुळे
न्याय मिळवणं आता महाग झाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
न्याय मिळवणं आता महाग झाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
Continues below advertisement