मुंबई : शेतकऱ्यांना वाटलेल्या कर्जाची जिल्हानिहाय माहिती सरकारकडे नाही, अनिल गलगलींचा दावा
Continues below advertisement
राज्यातील शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाची जिल्हानिहाय माहिती सरकारकडेच उपलब्ध नसल्याची माहिती उजेडात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 14 हजार 388 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं होतं. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबतची माहिती सरकारकडे मागितली होती. परंतु जिल्हा निहाय माहिती उपलब्ध नसल्याचं शासनाकडून कळवण्यात आल्याचा दावा गलगलींनी केला आहे. तसंच विदर्भातील गावनिहाय माहितीसुद्धा शासनाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे.
Continues below advertisement