मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला
मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यात ऐतिहासिक दिरंगाई करणारे कुलगुरू संजय देशमुखांवर, आता राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. संजय देशमुखांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा प्रश्न वाऱ्यावर सोडून संजय देशमुख एकाएकी रजेवर गेले.