
मुंबई : ग्राहकांसाठी खुशखबर, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट!
Continues below advertisement
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील चार दिवसात सोन्याच्या दरात 600 ते 800 रुपयांची घसरण झाली आहे. आज (18 जुलै) सोन्याचा दर प्रति तोळा 30 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. सुमारे पाच महिन्यांनंतर सोन्याचे दर कमी झाले आहेत. 8 फेब्रवारी 2018 नंतर सोन्याचा भाव 31 हजारांच्या खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरांमध्ये घसरण आणि स्थानिक सराफांकडून कमी झालेली मागणी यामुळे सोन्याचा दर कमी झाल्याचं समजतं. दुसरीकडे चांदीच्या दरातही प्रतिकिलो 620 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी तीन महिन्यांच्या निचांकी स्तरावर पोहोचल्याने आता प्रतिकिलो 39 हजार 200 रुपयांचा दर मिळत आहे.
Continues below advertisement