VIDEO | सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, रुपयाची घसरण झाल्याने परिणाम | मुंबई | एबीपी माझा
सोन्याच्या दरात आज विक्रमी वाढ झालीय.. सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा दर आज प्रतितोळा 34 हजार 400 रुपयांवर पोहचला. कालच्या तुलनेत सोन्याचे दर आज थेट 500 रुपयांनी वधारले. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपयांची झालेली घसरण, भारत आणि पाकमध्ये वाढलेला तणाव आणि जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीत झालेली वाढ याचा एकत्रित परिणाम म्हणून सोन्याच्या दरात दिवसेंदिवस होत असल्याचं जाणकारांनी सांगितलंय. असून,जलगावच्या सुवर्ण नगरीत आज 34400 इतक्या सर्वाधिक दराची नोंद करण्यात आली आहे ,आगामी काळात अजूनही सोन्याच्या दरात वाढ होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.