मुंबई : दिवाळीपर्यंत सोनं 34 हजारांवर जाण्याची शक्यता, चांदीही महागणार
Continues below advertisement
येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचे दर 34 हजार रुपये प्रतितोळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर आताच खरेदी करुन ठेवा.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय राजकीय आव्हानांचा परिणाम म्हणून येत्या दिवाळीत सोन्याचा भाव प्रतितोळा 34 हजार रुपयांची कमाल पातळी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेअर बाजारातून चांगला परतावा मिळत असल्याने सोन्यात होणाऱ्या गुंतवणुकीत घट झाल्याचे दिसत आहे. सोन्याच्या किंमतीवर याचाही परिणाम होऊ शकतो.कालचा सोन्याचा भाव होता 31 हजार 800 रुपयांवर होता.
चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. इंडस्ट्रीयल यूनिट्स आणि नाणे उत्पादकांच्या मागणीनंतर चांदीचे दर 100 रुपयांनी वाढून 41 हजार 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. भारतासह अमेरिकेतही चांदीचे भाव वाढले आहेत.