
मुंबई-गोवा मार्गावर धावणारी डबल डेकर रेल्वे बंद होणार?
Continues below advertisement
मुंबई गोवा मार्गावर धावणारी एसी डबल डेकर ट्रेन मध्य रेल्वे बंद करण्याच्या विचारात आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगांव या स्टेशनच्या दरम्यान डबल डेकर ट्रेन धावते. सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर हळू हळू प्रवाश्यांनी या ट्रेन कड़े पाठ फिरवली. तेजस एक्सप्रेस सुरु झाल्यापसुन या ट्रेनला अतिशय अल्प प्रतिसाद मिळत होता त्यानंतर ट्रेनचे वेळापत्रक बदलण्यात आले. शिवाय गाडी वारंवार उशिरा पोहोचू लागल्यानं प्रवाशांचा हिरमोड झाला. त्यामुळे शेवटी मध्य रेल्वेने या ट्रेनच्या सुरु ठेवण्याबाबत रेल्वे बोर्डाकडे विचारना केली आहे. तिथून जो प्रतिसाद येईल त्यावर या डबल डेकर गाडीचे भवितव्य अवलंबून असेल.
Continues below advertisement