मुंबई : 'धाकड गर्ल' झायरा वसीमची विमानात अज्ञाताकडून छेड, सर्वसामान्य मुलींच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
दंगल गर्ल झायरा वसिमसोबत विमान प्रवासादरम्यान एक घाणेरडा प्रकार घडला.. आज सकाळी दिल्लीहून मुंबईत येत असताना विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात एका अज्ञात व्यक्तीनं तिच्यासोबत गैरवर्तन केलं. विमानात झायराच्या सीटमागे बसलेल्या या व्यक्तीनं आपला पाय झायराच्या सीटवर ठेवला.. त्या माणसाचा पाय वारंवार तिच्या पाठीला, खांद्याला आणि मानेला लागत होता असा आरोप झायरानं केलाय.. सुरुवातीला तिला वाटलं की विमान थोडं हेलकावत असल्याने त्याचा पाय लागत असेल पण नंतर तो जाणून बूजून पायाने स्पर्श करत असल्याचं तिच्या लक्षात आलं.. जवळपास १० मिनिटं हा सगळा प्रकार सुरु होता. दरम्यान याबाबच झायराने विस्तारा एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं पण त्यांनी तिला कोणतीही मदत केली नाही असाही आरोप झायरानं केलाय. शेवटी झायराने त्याचा व्हिडिओ बनवून तो जाहीर केलाय. या प्रकाराची मुंबई पोलिसांसह महिला आयोगानंही गंभीर दखल घेतली आहे. तर विस्तारा एअरलाईन्सनं याबाबत दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
Continues below advertisement