मुंबई : जे. जे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा संप, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
मुंबईच्या जेजे रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी निवासी डॉक्टरांचा संप सुरु आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जोपर्यंत ठोस पावलं उचलली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवू, अशी भूमिका संपकरी डॉक्टरांनी घेतली आहे. परवा रुग्णाच्या मृत्यूनंतर नातलगांनी एका महिला डॉक्टरसह इतर काही डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून जेजेतल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
Continues below advertisement