मुंबई : डॉक्टरांच्या कट प्रक्टिसवरील बंदीसाठी राज्य सरकारकडून कायद्यासाठी हालचाली
Continues below advertisement
रुग्णसेवेला धंदा बनवणाऱ्या डॉक्टरांची तातडीनं सर्जरी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मार्च 2018 मध्ये विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कट प्रॅक्टिसवर बंदी आणणारं विधेयक मांडण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर सर्रासपणे रुग्णांची पिळवणूक करतात. विशेष म्हणजे, यामध्ये खासगी डॉक्टरांसोबतच सरकारी रुग्णालयातील डॉक्टरही लुटारे झाले आहेत. त्यामुळे कट प्रॅक्टिसला वेसण घालण्यासाठी तज्ज्ञांनी मसुदा तयार केला आहे. या कायद्याला मंजुरी मिळाल्यास असा कायदा करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरेल. कट प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर विशिष्ट डॉक्टर किंवा औषधांचा आग्रह धरतो. ज्याद्वारे संबधित डॉक्टराला मोठा आर्थिक लाभ होतो. गुन्हा सिद्ध झाल्यास पहिल्यांदा एक वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. तर दुसऱ्यादा दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
Continues below advertisement