ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : रेल्वे तिकिटांवर स्थानकांची नावं मराठीतही दिसणार!

Continues below advertisement
महाराष्ट्र दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून प्रवाशांना अनोखी भेट मिळणार आहे.. एक मेपासून रेल्वे तिकिटावर स्थानकांची नावं मराठीतही छापली जातील. लोकल गाड्यांच्या तिकिटावर तसंच एक्सप्रेस गाड्यांच्या तिकिटावरही महाराष्ट्रातल्या स्थानकांची नावं मराठीत छापली जातील. महाराष्ट्रातील सध्या रेल्वे तिकिटावर स्थानकांची नावं इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये छापली जातात.. मात्र 1 मेपासून यासोबत तिसऱ्या भाषेतही स्थानकाचं नाव असेल ते म्हणजे मराठीत.. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री सुनील उदासी यांनी याबाबत माहिती दिलीय. याबाबतचं प्रसिद्धीपत्रक नुकतच प्रकाशित करण्यात आलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram