घाटकोपर इमारत दुर्घटना : आरोपी सुनील शितपचा जामीनासाठी अर्ज
Continues below advertisement
घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितपनं जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. यावर आज सुनावणी होणार आहे. याप्रकरणी शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनील शितपप्रमाणेच त्या इमारतीत नूतनीकरणाचं काम करणारे कॉन्ट्रैक्टर्स, आर्किटेक्ट यांनाही सहआरोपी करण्यात आलं. दरम्यान, इमारत जुनी झाल्यानं ती धोकादायक अवस्थेतच होती. त्यामुळे आपल्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं शितपच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आलं.
Continues below advertisement