मुंबई : घारापुरी बेटावर आता 24 तास वीजपुरवठा
Continues below advertisement
घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाच जणांना प्रातिनिधीक स्वरूपात वीज मीटरच्या जोडणीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे , पर्यटनमंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे उपस्थित होते. घारापुरी बेट पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचे स्थान होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Continues below advertisement