मुंबई : प्रक्रिया केंद्र उभारा, अन्यथा कचरा उचलणार नाही, मुंबई महापालिकेची तंबी
एकीकडे औरंगाबादमध्ये कचराप्रश्न पेटलेला असतानाच आता मुंबईतही कचरा कोडींचं चित्र पाहायला मिळू शकतं. कारण गृहनिर्माण सोसायट्यांचा कचरा पालिका उचलणार नाही, अशी तंबी मुंबई महापालिकेनं दिली आहे. सोसायट्यांनी यापुढं ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, आणि त्यावर प्रक्रिया केंद्र उभारावी असं मनपानं सांगितलं. मात्र, या आदेशाचा सगळीकडे बोजवारा उडाल्याचं दिसतं आहे. त्यामुळे वांद्रेसह अनेक भागात कचरा साठल्याचं पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे, ज्या शिवसेनेची सत्ता महापालिकेवर आहेत, त्याच शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर कचऱ्याचे ढीग लागले आहेत.