मुंबई : नीरव मोदी बेल्जियममध्ये, ईडीच्या छाप्यात 5 हजार कोटींचे दागिने आणि हिरे जप्त
Continues below advertisement
पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 360 कोटी रुपयाचा चुना लावून नीरव मोदी थेट बेल्जियमला पसार झाल्याची माहिती मिळतेय.
विशेष म्हणजे नीरव मोदीचा परिवार बेल्जियममध्येच राहतो. नीरव मोदीचा भाऊसुद्धा बेल्जियमचाच नागरिक असल्याची माहिती समोर आलीय.
मात्र बेल्जिअम आणि भारतात कोणताही करार नसल्यानं नीरवला भारतात आणणं अवघड होणार असल्याचं कळतंय..
दरम्यान आता भारतीय नागरीक असलेल्या नीरवची मालमत्ता जप्त करुन त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची विनंती ईडी आणि सीबीआय परराष्ट्र खात्याला करणार असल्याचं कळतंय.
काल नीरवच्या भारतातील मालमत्तांवर ईडी-सीबीआयनं छापेमारी करुन एकूण 5 हजार कोटी रुपयांचे दागिने आणि हिरे जप्त करण्यात आल्याचं कळतंय. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.