मुंबई : मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर हाय टाईड, प्रशासनाचं सतर्कतेचं आवाहन
Continues below advertisement
मुंबईमध्ये आज दुपारी लाटांच्या या तांडवनृत्याला सुरुवात झाली... दुपारी 1 वाजून 49 मिनिटांनी मुंबईच्या समुद्रात 4.97 मिटरच्या लाटा उसळल्या... त्यामुळे समुद्राचं पाणी मुंबईच्या रस्त्यांवर आलं... मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी हे लाटांगण पाहण्यासाठी मुंबईकरांनी रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत गर्दी केली...
गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, बांद्रा रिक्लमेशन, जूहू अशा किनाऱ्यांवर मुंबईकरांचे जथ्थेच्या जत्थे आले होते... पण तटरक्षक दल, पालिका आणि पोलिसांनी या किनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्तही लावला होता..
Continues below advertisement