मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांना वॉटरपार्कचं रुप
Continues below advertisement
तुम्ही वॉटरपार्कमध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर त्याची काही गरज नाहीय.. कारण, सध्या मुंबईतले अनेक रस्ते हे वॉटरपार्कपेक्षा कमी थ्रिल देणारे नाहीयत. अनेक ठिकाणी गुडघ्यांपर्यंत पाणी मुंबईच्या रस्त्यांवर साचलंय. त्यामुळे मुंबईकर याच मोफतच्या वॉटरपार्कमध्ये उड्या मारुन मनसोक्त आनंद लूटत आहेत. सोशल मीडियात मुंबईच्या या स्थितीवरुन मुंबई महापालिका आणि राज्य सरकारची खिल्ली उडवली जातेय. दरम्यान, असं असलं तरी साचलेल्या पाण्यात पोहू नका, त्यामुळे रोगराईची शक्यता आहे.. असं आवाहन करण्यात येतंय.
Continues below advertisement