मुंबई : स्टेडियममध्ये गर्दी करा, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचं आवाहन

Continues below advertisement
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री मुंबईच्या फुटबॉलरसिकांवर खूपच नाराज झाला आहे. आणि त्याचं कारण आहे अंधेरीतल्या मुंबई फुटबॉल एरिनात नुकत्याच खेळवण्यात आलेल्या भारत आणि चीन तैपेई सामन्याकडे मुंबईकरांनी फिरवलेली पाठ. हा सामना इन्टरकॉन्टिनेन्टल कप चौरंगी फुटबॉल स्पर्धेतला होता. त्यात भारताने चीन तैपेईचा ५-० असा धुव्वा उडवला. कर्णधार सुनील छेत्रीनं गोलची हॅटट्रिक साजरी करुन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पण भारतीय फुटबॉल संघाची ही कामगिरी पाहायला जेमतेम अडीच हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. या स्पर्धेत उद्या भारताचा सामना केनियाशी होत असून, सुनील छेत्रीच्या कारकीर्दीतला तो शंभरावा सामना आहे. आमचा खेळ आवडला नाही, तर आम्हाला शिव्या घाला, आमच्या कामगिरीवर टीका करा, पण स्टेडियममध्ये या असं भावनिक आवाहन सुनील छेत्रीनं केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram