मुंबई: गेल्या 6 वर्षात आगीच्या 29,140 दुर्घटना
Continues below advertisement
मुंबईत गेल्या सहा वर्षात मुंबईत तब्बल 29 हजार 140 आगीच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलांनी दिली आहे. मुंबईत 2012 पासून एप्रिल 2018 पर्यंत एकूण 29 हजार 140 आग लागण्याची घटना झाल्या आहे. यात 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 925 जण आगीच्या दुर्घटनेत जखमी झाले आहे. आग विझवताना एकूण 120 अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.
Continues below advertisement