Maharashtra Budget 2018 : महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प, सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण

Continues below advertisement
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला.. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. राज्यातील तब्बल 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचा दावा मुनगंटीवारांनी केला. सिंचन आणि जलसंपदा योजनांसाठीही भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत. जलयुक्त शिवारअंतर्गत 5 हजार गावं टंचाईमुक्त करण्याचं उद्दिष्ट त्यांनी बोलून दाखवलं. त्याचसोबत भावनिक अस्मिता जोपासण्याचाही सरकारनं पुरेपूर प्रयत्न केला. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी 300 कोटींची तरतूद तर  इंदू मिलसाठी 150 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचं कामही पुढच्या महिन्यापासून सुरु करण्याचा निर्धार अर्थमंत्र्यांनी बोलून दाखवला. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांसोबतच शिवसेनेचाही जोरदार विरोध आहे. महामार्गामुळे  विदर्भ-मराठवाडा-खान्देश कोकणाशी जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई-नागपूर हे 700 किमीचं अंतर अवघ्या 6 तासाता कापता येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram