मुंबई : भांडुपमध्ये हातगाडी लावण्याच्या वादातून वडिलांसह दोन मुलांची हत्या

Continues below advertisement
मुंबईतल्या भांडूपमध्ये भाजीपाल्याची हातगाडी लावण्यास विरोध करणाऱ्या एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्या केली गेलीय. काल भांडुपमधल्या सोनापूर विभागात झकेरीया कम्पाऊंड इथं हा प्रकार घडला. मारेकरी याच विभागात राहणारे फेरीवाले आहेत. गुलाम अली खान, त्यांचा मोठा मुलगा सैबाज खान आणि दुसरा मुलगा सादाब खान अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावं आहेत. गुलाम अली खान यांच्या घरासमोर फेरीवाल्यांनी
भाजीपाल्याची गाडी लावत होते. मात्र त्याला खान कुटुंबाचा विरोध असल्यामुळे तिघांची हत्या केली गेल्याची माहिती आहे. संशयित आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र हत्येनंतर त्यांनी कुटुंबासह या भागातून पळ काढला आहे.
मुंबई पोलिसांपुढे आता आरोपींना पकडण्याचं आव्हान आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram