मुंबई : खिल्ली उडवणाऱ्या शोभा डेंचे लठ्ठ पोलिसांकडून आभार, कारण...
स्तंभलेखिका शोभा डे यांनी ट्विट करुन केलेल्या अपमानाचा चांगलाच फायदा मध्य प्रदेशातील लठ्ठ पोलीस अधिकारी दौलतराम जोगावत यांना झाला आहे. कारण गेल्या वर्षी डे यांनी ट्विट केल्यानंतर जोगावत यांनी वजन कमी करण्याचं मनावर घेतलं. इतकंच नाही तर त्यांनी मुंबई गाठून वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ज्यामुळे जोगावत आता 180 किलोवरुन थेट 115 किलोवर आलेत. त्यांनी एकूण 65 किलो वजन घटवलं आहे. इतकंच नाही तर डाएट आणि व्यायाम करुन अजून 30 किलो वजन कमी करण्याचं लक्ष्य दौलतराम जोगावत यांनी ठेवलंय.