मुंबई : अभिनेत्री राधिका आपटेचा 'फॅशन का जलवा'!
Continues below advertisement
वॅन ह्युसेन प्लस जीक्यू फॅशन नाइट्स 2017 हा फॅशन शो काल रात्री मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी अभिनेत्री राधिका आपटेनं निखिल-शंतनू या डिजायनर जोडीसाठी रॅम्पवॉक केला. यावेळी राधिकानं खाकी कलरच्या ड्रेसवर नेव्ही ब्ल्यू कलरचं स्टायलिश असं जॅकेट घातलं होतं. राधिकानं आपल्या स्टायलिश रॅम्पवॉकनं उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी रॉबर्ट वाड्रा, शमिता शेट्टी यासह अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते.
Continues below advertisement