मुंबई : भाजीपाला विक्रीसाठी परवानगी नसल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल मंत्रालयाबाहेर फेकला

Continues below advertisement
आई जेऊ घालेना आणि बाप भिक मागू देईना. अशी अवस्था झालेल्या भाजीपाला उत्पादकांनी आज आपला भाजीपाला चक्क मुंबईतल्या मंत्रालयाच्या दारावर फेकून दिला.  भाजीपाल्याला दर मिळत नाही. म्हणून उस्मानाबादमधल्या शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला विकण्यासाठी मुंबईत आणला. पण कांदिवलीतल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक विक्रेत्यांनी भाजी विकण्यास मज्जाव केला. त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram