मुंबई : आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याने 15 लाखांचं अनुदान नाकारलं
Continues below advertisement
मुंबई : संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 80 वर्षीय आजोबांना 15 लाखांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील याने हे अनुदान नाकारलं आहे.
मोबदला वाढवून देण्याच्या मागणीवर नरेंद्र पाटील ठाम आहे, म्हणूनच त्याने हे अनुदान नाकारलं. धुळ्याच्या धर्मा पाटील यांना अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. सानुग्रह अनुदान एक महिन्याच्या आत मिळेल असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलं होतं.