मुंबई | आशिया चषकात भारत-पाकिस्तान आमने-सामने
आशिय़ा चषकात आज भारताचा पाकिस्तानसोबत महामुकाबला रंगणार आहे. तब्बल सव्वा वर्षांनी होणाऱ्या या सामन्यासाठी चाहत्यांची उत्स्कुता शिगेला पोहोचली आहे. टीम इंडियाच्या दृष्टीनं आव्हानात्मक बाब म्हणजे हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यानंतर केवळ सोळा तासांत पाकिस्तानचा मुकाबला करावा लागणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा धुव्वा उडवला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ नक्कीच उत्सुक असेल. आशिया चषकात आजवर भारत आणि पाकिस्तान संघांत ११ सामने झाले आहेत. भारत आणि पाकिस्ताननं त्यापैकी पाच-पाच सामने जिंकले आहेत.