कल्याण | गणपतीच्या देखाव्यातून पारंपरिक खेळांवर प्रकाश
सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात लहान मुलं जुने खेळ विसरत चाललेत. यावर कल्याणच्या अष्टविनायक मित्र मंडळानं देखावा सादर केलाय. यामध्ये लगोरी, लंगडी, लपाछुपी, गोट्या, आट्यापाट्या असे अनेक खेळ चित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेत. आजच्या काळातल्या मुलांना या खेळांची माहिती व्हावी. आणि त्यांच्यात या खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी हा अनोखा देखावा साकारण्यात आलाय.