मुंबई : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुंबईच्या रस्त्यावर फटकेबाजी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्व स्तरावरच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला, त्याला आता पाच वर्षे व्हायला आली आहेत. पण सचिनची फलंदाजी करण्याची खुमखुमी काही कमी झालेली नाही. सचिनचा दोस्त आणि माजी कसोटीवीर विनोद कांबळीनं सचिनचा चक्क मुंबईच्या रस्त्यावर फलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सचिनची हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत क्रिकेट खेळतानाची ही दृश्यं रात्री उशिराची आहेत. तसंच मेट्रोच्या खोदकामासाठी व्यापलेला रस्ताही या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
सचिनची हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत क्रिकेट खेळतानाची ही दृश्यं रात्री उशिराची आहेत. तसंच मेट्रोच्या खोदकामासाठी व्यापलेला रस्ताही या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.