मुंबई : लोकलच्या टपावर चढल्याने शॉक लागून एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jun 2018 02:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात एक तरूण लोकल ट्रेनच्या टपावर चढला. या तरुणाला वीजेचा जबरदस्त धक्का बसला आहे. आणि त्यात त्याचा मृत्यू झालाय. या तरुणाचे नाव काय आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही झाला होता. सध्या रेल्वे वाहतुक सुरळीत सुरु आहे. वारंवार सूचना देऊनही प्रवासी हट्टीपणे टपावर चढण्याचा आततायी निर्णय घेतातच. अशात हा तरूण नेमका लोकलच्या टपावर का चढला होता हे समजू शकलेले नाही.