मुंबई : संभाजी भिडेंच्या अटकेसाठी भारिपचा आज एल्गार मोर्चा
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करा, या मागणीसाठी आज मुंबईत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. भायखळा येथून एल्गार मोर्चा निघणार होता. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ सर्व कार्यकर्ते जमतील आणि तिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे.
Continues below advertisement