मुंबई : बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीचं समन्स
बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीनं समन्स बजावलं आहे. आपला जबाब नोंदवण्यासाठी राज कुंद्रा मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात दाखल झाला आहे. बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला अटक केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत बॉलिवूडमधल्या अनेकांची या घोटाळ्यात नावे बाहेर आली. याच घोटाळ्यात राज कुंद्राचं नाव बाहेर आल्यानंतर ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी मुंबईत बोलावलं. अमित भारद्वाज या मुख्य आरोपीने एक वेबसाईट सुरु करुन अनेकांना कोट्यवधींचा चुन्हा लावला आहे.