मुंबई : रिक्षावाल्याने भाडं नाकारलं, पोलिसांकडूनही अपमान, महिला डीवायएसपींची फेसबुक पोस्ट
Continues below advertisement
सुजाता पाटील यांनी अंधेरी पश्चिमेला रिक्षाचालकाला भाड्यासाठी विनंती केली, मात्र त्याने भाडे नाकारलं. त्याची तक्रार उपस्थित पोलिसांना केली, पण पोलिसांनी सुजाता पाटील यांनाच अपमानास्पद वागणूक दिली. मग त्यांनी डी एन नगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिसांना तक्रार केली, मात्र त्यांच्याकडूही प्रतिसाद मिळाला नाही.
सुजाता पाटील भोपाळवरुन रेल्वेनं मुंबईत आल्या होत्या. त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. मुलगी आजारी. सोबत दोन बॅगा होत्या. अशा परिस्थितीत रिक्षाचालकांनी मुजोरी केलीच, पण पोलिसांनीही अपमानास्पद वागणूक दिल्याने, सुजाता पाटील यांनी फेसबुकवर व्यथा मांडली. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाकडेही सविस्तर प्रतिक्रिया दिली.