Dushyant Chaturvedi | दुष्यंत चतुर्वेदींचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं | ABP Majha
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी दुष्यंत यांच्या हाती शिवबंधन बांधलं. विदर्भात शिवसेनेला अधिक बळकटी देण्यासाठी दुष्यंत यांना चांगली जबाबदारी देण्यात येईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय.