मुंबई : भीक मागा, उसने घ्या, पण रिकाम्या हाताने येऊ नका, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी

Continues below advertisement
हजारो गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डि.एस. कुलकर्णीं हायकोर्टात 50 कोटी भरण्यात पुन्हा एकदा अपयश आलं आहे. आजच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टानं राज्य सरकारला चांगलंच फटकारलं आहे. डीएसकेंची कस्टडी हवी अशी मागणी पोलिसांनी एकदाही कोर्टाकडे का केली नाही असं विचारत पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. शिवाय डिएसकेंकडून 50 कोटींची रक्कम वसुल करण्याची जबाबदारी ही सरकारी पक्षाचीच असल्याचं कोर्टानं म्हंटलं आहे. 
डिएसकेंसंदर्भात कागदी घोडे नाचवणं थांबवावं असं सांगत कोर्टानं राज्य सरकारची कानउघडणी केली आहे. 
दरम्यान उच्च न्यायालयानं डिएसके आणि गुंतवणूकदारांची बाजू ऐकून घेत डीएसकेंना 13 फेब्रुवारीला हजर राहण्याचे निर्देष दिले आहेत. शिवाय पुढच्या तारखेला रिकाम्या हातानं येऊ नका, उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहीती द्या. अशी तंबी कोर्टानं डिएसकेंना दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram