मुंबई : मुंबई मॅरेथॉनमधील ड्रीम रनला मोठा प्रतिसाद, सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीही धावले

Continues below advertisement
मुंबई मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा इथियोपियन धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. विशेष म्हणजे हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये सैन्य दलातील धावपटूंनी, तर महिला गटात नाशिकच्या मराठमोळ्या मुलींनी बाजी मारली. हाफ मॅरेथॉनमध्ये एकूण तिघा मराठी धावपटूंनी आपला ठसा उमटवला.

जानेवारी महिन्याचा तिसरा रविवार आणि मुंबई मॅरेथॉन हे समीकरण ठरलेलं आहे. सलग अकराव्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रोकॅम इन्टरनॅशनलच्या वतीनं आज टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं.

हौशी धावपटूंच्या मॅरेथॉन (अमॅच्युअर फुल मॅरेथॉन) ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई मॅरेथॉनला पहाटे पाच वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. तर एलिट मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील नामवंत धावपटूही सहभागी झाले.

या दोन शर्यतींना जोडूनच अर्धमॅरेथॉन, 10 किलोमीटर्स रन, सीनियर सिटिझन्स रन, व्हीलचेअर रन आणि ड्रीम रन अशा पाच शर्यती होत्या. अर्धमॅरेथॉनची सुरुवात वरळी सीफेसवरच्या वरळी डेअरीसमोरुन झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram