मुंबई : डॉ. सुहास पेडणेकरांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला

Continues below advertisement
डॉक्टर सुहास पेडणेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला आहे. मागच्या ६ महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाचं कुलगुरुपद रिक्त होतं.
5 वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची पासष्ठी पूर्ण करेपर्यंत कुलगुरुपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑनलाईन असेसमेंट मधील गोंधळानंतर तत्कालीन कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना कार्यमुक्त करण्यात आलं. तेव्हापासून विद्यापीठाचं कुलगुरुपद रिक्त होतं. याआधी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहात होते..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram