नागपूर : डॉ. अभय आणि राणी बंग यांना पद्म पुरस्कार जाहीर, अभय बंग यांच्याशी खास बातचीत
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकूण 85 रत्नांना पद्म पुरस्कारचा सन्मान मिळालाय. महाराष्ट्रातून डॉ. अभय बंग, राणी बंग, गंगाधर पानतावणे, अरविंद गुप्ता, मुरलीकांत पेटकर यांनाही पद्मश्री पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलंय तर संपत रामटेके यांना मरणोत्तार पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. तर क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला पद्मभूषण आणि संगितकार इलाई राजा यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.