मुंबई : डॉक्टरांच्या संपाचा तिसरा दिवस : महाजनांसोबतच्या बैठकीत ठोस निर्णय नाही!
Continues below advertisement
जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत जेजे रुग्णालयातले निवासी डॉक्टर संपावर कायम राहणार आहेत. मुंबईतल्या जेजे रुग्णालयात झालेल्या मारहाणीनंतर निवासी डॉक्टर्स, जेजेचे डीन यांची गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत डॉक्टरांचा संप मागे घेण्यासंबंधात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. डॉक्टरांच्या सुरक्षेसंबंधात उपाययोजना करण्यासंदर्भात गिरीष महाजन यांनी डॉक्टरांना आश्वासन दिलं आहे. प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीने वाढवावी, अशी प्रमुख मागणी मार्डची आहे. मागच्या तीन दिवसांपासून जेजे रुग्णालयात निवासी डॉक्टरांचा संप सुरु आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होतेय.
Continues below advertisement