माझा इम्पॅक्ट : ऑक्सिटोसिन अवैधपणे विकणाऱ्या राज्यभरातील औषध दुकानांवर कारवाई
Continues below advertisement
एबीपी माझाने दाखवलेल्या ऑक्सिटोसिनच्या अवैध विक्रीच्या बातमीनंतर अन्न व औषध प्रशासनाला जाग आली आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि कोणत्याही नोंदणी किंवा चौकशीशिवाय ऑक्सिटोसिन विकणाऱ्या मुंबईतील 17 मेडिकल स्टोअरवर एफडीएची धडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत सायन, परळ, अंधेरी, दहिसर, कांदिवली, घाटकोपर या भागांमध्ये एफडीएच्या मेडिकल स्टोअरवर धाडी टाकण्यात आल्या असून, अनेक ठिकाणी एफडीएने बोगस ग्राहक पाठवून, ऑक्सिटोसिनची अवैध विक्री पकडली. अनेक ठिकाणी ऑक्सिटोसिनचा अवैध साठा आढळला. तसेच, संबंधित मेडिकल स्टोअरचे सर्व रेकॉर्डस् चेक करण्यात आले.
Continues below advertisement