दिवाळी संपली, बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस कागदावरच | मुंबई | एबीपी माझा
बेस्टच्या 5500 रूपये दिवाळी बोनस म्हणून जाहिर केला होता. मात्र दिवाळी संपली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांचा बोनस केवळ कागदावरच असून पैसे नसतांना बेस्ट प्रशासनानं केलेली ही घोषणा हवेतच विरली आहे. प्रशासकीय तरतूद न झाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना जाहिर झालेला 5,500 रुपयांचा बोनस अद्याप देऊ शकत नसल्याची कबुली बेस्ट प्रशासनाने दिली आहे.