मुंबई : नाणार प्रकल्पाच्या करारावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली
Continues below advertisement
नाणार प्रकल्पावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी बघायला मिळाली. बैठकीत सेनेच्या मंत्र्यांनी याप्रकरणी निषेध नोंदवला. नाणार प्रकल्पाबाबत झालेल्या कराराविषयी विश्वासात घेतलं नसल्याची तक्रारही त्यांनी केली. दरम्यान उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य़ांनी सेना मंत्र्य़ांना दिलं आहे.
Continues below advertisement