मुंबई : वीरपत्नींना एसटीचा आजीवन प्रवास मोफत, स्मार्ट कार्ड वाटप
Continues below advertisement
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेतंर्गत भारतीय सैन्यातील, सुरक्षा दलातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीरपत्नीला एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत मिळणार आहे. या सवलत योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी (1 मे 2018) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते सवलत कार्ड देऊन होणार आहे.
Continues below advertisement