मुंबई : धर्मा पाटील यांचं पार्थिव कुटुंबीयांनी स्वीकारलं
Continues below advertisement
सरकारच्या लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटील यांचं पार्थिव त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर धर्मा पाटील यांचं पार्थिव धुळ्याकडे रवाना करण्यात आलं. लेखी आश्वासनाशिवाय पार्थिव नेणार नाही, अशी ठाम भूमिका घेत पाटील यांच्या मुलाने जेजे रुग्णाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. सरकारनं संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर धर्मा पाटील यांचं पार्थिव स्वीकारण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. बुधवारी सकाळी धर्मा पाटील यांच्यावर धुळ्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Continues below advertisement