मुंबई: धर्मा पाटील यांचा मृत्यू, मुलाचं जेजे रुग्णालयाबाहेर आंदोलन

Continues below advertisement

सरकारच्या अनास्थेमुळे धर्मा पाटलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शेतकरी एकवटलेत.
धर्मा पाटलांच्या गावातील शेतकऱ्यांना रास्ता रोको करुन सरकारचा निषेध सुरु केलाय. तर इकडं मुंबईत धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी जे जे रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरु केलंय. जोवर योग्य मोबदल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही, आणि धर्मा पाटील यांना शहीद शेतकरी घोषित करत नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलंय.
काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेजे रुग्णालयात 84 वर्षाच्या धर्मा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.
या घटनेनं राज्यभऱातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram