मुंबई : तरुणीने ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबला, कारने 5 जणांना उडवलं!

Continues below advertisement
कारच्या ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबल्याने मुंबईतील धारावीत अपघात झाला. यात पाच जण जखमी झाले असून, जखमींमध्य एका चिमुकल्याचाही समावेश आहे.

ध्रुवी जैन या 19 वर्षीय तरुणीने सिग्नल लागल्याने कारवर ताबा मिळवण्यासाठी ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटर दाबलं आणि पाच जणांना जोरदार धडक दिली. जीवितहानी झाली नाही, मात्र पाच जण जखमी झाले आहेत.

वकिलीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेली ध्रुवी जैन ही कार चालवत होती, तर तिच्यासोबत तीन मैत्रीही कारमध्ये होत्या. या सगळ्या वांद्रे येथे जात असताना धारावीत हा अपघात झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram