मुंबई : खरा दे धक्का 24 तारखेला कळेल, धनंजय मुंडेंचा इशारा

Continues below advertisement
मुंबई/लातूर : नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रमेश कराड यांनी विधानपरिषद उमेदवारीचा फॉर्म मागे घेतला. यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना चांगलाच धक्का बसला आहे. मात्र खरा दे धक्का काय असतो ते 24 तारखेला म्हणजे विधानपरिषद निवडणुकीच्या निकालालाच कळेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला. कारण, भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं. मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्वीस्ट आला आहे.

''भाजपने उमेदवारी न दिल्याने रमेश कराड नाराज होते. त्यांना आम्ही पक्षात घेतलं, उमेदवारीही दिली. त्याबद्दल त्यांनी कृतघ्नता व्यक्त करायला हवी. मी चेकमेट झालेलो नाही, अभी तो खेल शुरु हुआ है,'' असंही धनंजय मुंडे म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram