UNCUT : ईव्हीएम बिघाडाचा सर्वाधिक फटका भाजपलाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

Continues below advertisement
पालघर आणि भंडारा-गोंदियामध्ये झालेल्या ईव्हीएम बिघाडाचा सर्वाधिक फटका भाजपलाच झाला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे जिंकल्यानंतर ईव्हीएमचा दोष नाही आणि हरल्यानंतर ईव्हीएमचा दोष, ही सवय विरोधकांनी सोडून द्यावी, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात लढणं हे अयोग्य असल्याचं मत व्यक्त करुन, शिवसेनेनं युतीसाठी आता एक पाऊल पुढे येण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. आज पालघ पोटनिवडणुकीतल्या विजयाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram