मुंबई : मराठा मोर्चाची उद्या बंदची हाक, पोलीस उपायुक्तांचं शांततेचं आवाहन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मराठा मोर्चाच्या वतीनं उद्या मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. आज मुंबईत मराठा मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली. यात बैठकीत उद्या मुंबई बंदचं आवाहन देण्यात आलं आहे. मुंबई बरोबरच ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा बंदचं आवाहन मराठा मोर्चाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, बंदवेळी कुठल्याही प्रकारची हिंसा करु नका असं आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी केलंय. तसंच उद्याच्या बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, तोडफोड होणार नाही, याची काळजी घेण्यासही मोर्चाकडून बजावण्यात आलं आहे. आम्ही देखील मराठा समाजाच्या बांधवांना शांततेचं आवाहन करत आहोत.