मुंबई : कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही : निवडणूक आयोग
पालघर आणि भंडारा गोंदियामध्ये कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही निवडणूक आयोगाने दिली आहे. उपमुख्य निवडणूक आयुक्त शिरीष मोहोड यांनी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यानं फेरनिवडणूक होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये अडचणी आल्या होत्या, मात्र त्या दूर करण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलंय.