Dengue | मुंबई महापालिका आयुक्तांच्या इमारतीला डेंग्यूचा विळखा | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
मुंबई महापालिका आयुक्तांच्या इमारतीलाच डेंग्यू, मलेरियाचा विळखा पडल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. महापालिकेचे नवे आयुक्त प्रविण परदेशी यांचं निवास्थान असलेल्या सुरुची, सुनिती अपार्टमेंटमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. याच भागात महापालिका आयुक्तांव्यतिरिक्त न्यायाधीश, उच्चपदस्थ अधिकारी, सनदी अधिकारी यांची निवासस्थाने आहेत. मंत्रालय आणि विधानभवन परिसरातही डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची उत्पत्तीस्थानं आढळून आली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही धक्कादायक बाब आढळून आल्यानं महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर नवं आव्हान उभं ठाकलंय.
Continues below advertisement